Skip to main content

Bulletin

वेबसाइट वर वधू-वर माहिती देताना कृपया फोटो सहितद्या. अधिक माहितीसाठी संपर्क - सुनील जाधव :- 9890677914 ( suniljadhav101@gmail.com ),प्रशांत मंडले( +91 9588450297), अनिल भांडवलकर :- 9923232424 ( anilbhandwalkar@rediffmail.com ), मल्हारी चव्हाण :- 8600858143 ( malhari91@gmail.com )

History

update aggregater

History of Ramoshis
१८७१ मध्ये ब्रिटीश सरकारने काही जमातींना कायद्याने  "गुन्हेगार" ठरविले .  तत्कालीन समाजाने कायद्याचा विरोध केला नाही. ह्या कायद्यामधील   कलमे खूप कठोर होती .१) या जमातीतील लोकांना पोलीस पाटलांच्या परवानगी शिवाय एका गावाहून दुसऱ्या गावाला जाता येत नसे. २) पुरुषांना दिवसातून ३ वेळा चावडी / पोलीस याचाकडे हजेरी लावावी लागे. ३) सरकार या जमाती बरोबर तह /करार करून त्यांना गावाबाहेर ठेऊ लागले. ४) कोणालाही अटक करू लागले.  इथून पुढे हा समाज कायद्याने आणि सामाजिक कचाट्यात सापडला, व त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला.  ब्रिटीश येण्यापुर्वी ह्या समाजाची परस्थिती कशी होती ? आजचा रामोशी हा आंध्र प्रदेश मध्ये बोया , तर  कर्नाटक व तामिळनाडू मध्ये  बेरड, बेडर, वेदान अश्या नावाने ओळखला जात होता. महराष्ट्रातील रामोशी हे कर्नाटक मधून आले असावेत कारण त्याचे आडनाव बेरड- रामोशी यांच्या बरोबर जुळते. त्यांची बोलीभाषा दक्षिणेकडील (तेलागणं ) असावी , ते प्रथम कर्नाटक मध्ये स्तलांतरित झाले , मग पुढे महाराष्ट्र मध्ये आले. "बुयाल" हा बेरड भाषेतील शब्द "बोया" या शब्दापासून घेतला असावा. रामोशी हा शब्द १०० ते १५० वर्षे जुना असावा.

In 1871 theBritish Government declared some tribes as "Criminal". The established societydid not oppose this, contrary they seem to have liked it. Some clauses were: 1. Permission should be obtained from police while shifting from one location toother. 2. Govt. could send the group of people outside thebounds of a certain area. 3. Govt. got the right to form a 'settlement' andkeep the groups of people there. Before the British came, what was theirhistory? Today'sRamoshiwas calledBoya,BeradandVedan. InAndhrait was calledBoyaand inKarnatakaandTamilnaduit was calledBeradandBedar. Ramoshisof Maharashtra have come from mostlyKarnatakaand their surnames are same asBerad-RamoshiofKarnataka. Their original language issothern. They first got settled inKarnatakaand later migrated to Maharashtra.Word 'Bhuyal' inBerad'slanguage seems tohave originated fromBoya. though it is known in Maharashtra asRamoshi-Berad, the name 'Ramoshi' is notolder than 100-150 years.

कॅप्टन  अलेकझेन्डर  माकिंनठोश यांनी १८३३ मध्ये लिहिलेले पुस्तक :- रामोशी समाजाचा इतिहास व राजे उमाजी नाईक यांचा उठाव.
Please find attchment of Ramoshi's history and Umaji Naik Revolution Written By -
Captain Alexander Mackintosh in 1833 archived by california University  Click Here
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

**आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक

मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा श्री खंडोबा भक्त उमाजी नाईकने इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून

त्यांला आद्यक्रांतिवीर असे म्हणतात. छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमीकाव्याने लढत इंग्रजांशी झुंज दिली.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याची रखवाली करीत असलेल्या रामोशी  बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी गावामध्ये झाला. उमाजी जन्मापासूनच  हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी  हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने  दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कु-हाडी, तीरकामठ, गोफणी चालवण्याची कला अवगत केली. याकाळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली. हळूहळू मराठी मुलुखहि जिंकत पुणे ताब्यात  घेतले. १८०३ मध्येपुण्यात दुस-या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्व प्रथम त्याने इतर सर्व किल्ल्या प्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने  त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजीनाईक, कृष्णनाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळंसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्रीखंडेरायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
इंग्रज , सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार, अन्याय झालाच तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रासदिल्यामुळे उमाजीला  १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्या काळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धच्या कारवाया आणखी वाढवल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.
उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिनटोष याने क-हेपठारच्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात  तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने पाच इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ पाच हजार सैन्य होते.
१८२४ ला उमाजीने भांबुर्डा येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभाली साठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणा-या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते. आणि काहीचे प्राण  घेतले होते. १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने  प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोक-या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एक प्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हा पासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. मोठे सावकार ,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली .उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला.  इंग्रजांनी उमजीची माहिती देणा-यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.१५ डिसेंबर १८३१रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्या वर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्याखोलीत ठेवण्यात आले अशा याखोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिनटोष दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली.नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा  सुनावली. ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्व प्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.


**हुतात्मा हरी मकाजी नाईक

हुतात्मा  हरी मकाजी नाईक म्हणजे इतिहासाच्या पानामध्ये दडलेले एक कर्तुत्ववाण व्यक्तिमत्व, आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर थोड्याच अवधीत ब्रिटीश प्रशासनाला सळोकीपळो करून सोडले आणि अखेरीस येळकोट येळकोट जय मल्हार च्या जय घोषात हौतात्म्य स्वीकारले. अशा दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा.

 क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावरून प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले, त्यापैकी एक वासुदेव बळवंत फडके. त्यांनी १८५७ च्या उठवानंतर इंग्रजां विरुद्ध गनिमी काव्याने लढण्याचा निश्चय करून बंड उभे केले. ब्रिटीश प्रशासनाला मदत करणा-या धन दांडग्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण करण्याचा मनसुबा आखला आणि सर्व जातीधर्म समावेशक अशी फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी रामोशी ,महार, मातंग, कोळी, कुणबी, मराठा, चांभार न्हावी आणि मुसलमान अशा विविध जातीधर्मातील लोकांना एकत्रित करून बंड उभे केले. यातील सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो रामोशी समाजाचा.महाराष्ट्राचे वैभव असलेले सह्याद्री वरील गड किल्ले यांच्या रक्षणाची जबाबदारी रामोशी समाजा कडे होती. परंतु इंग्रजांनी गड किल्ले खालसा केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली. टोळीने संघटीत राहून दरोडा टाकायचा व आपली उपजीविका चालवायची असा रामोशी समाजाचा दिनक्रम चालू असताना क्रांतिवीर उमाजीने या दिन क्रमाला वेगळी वाट दाखवून आशेचा किरण दाखविला. परंतु त्यांच्या नंतर रामोशी समाज जुन्याच वाटेने चालू लागला. इसवी सन १८७७ च्या सुमारास फडकेंनी पुणे, सातारा, सांगली. सोलापूर परिसरातील रामोशी समाजाची चाचपणी करण्यास सुरवात केली व एक बंड उभे केले. या बंडा ची दिशा क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रमाणेच होती. ब्रिटीश प्रशासनाला हादरविण्यासाठी धनदांडग्यांच्या घरावर दरोडे घालायचे आणि त्या पैशाचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करायचा. या कार्यातील त्यांचे प्रमुख शिलेदार होते दौलतराव नाईक आणि हरिमकाजी नाईक.जिल्हा सातारा खटाव तालुक्यातील कळंबी गावाचा रहिवासी असलेला हरी, धाडसी आणि शूरवीर होता, पूर्व कल्पना देवून धाडसी वृत्तीने दरोडा घालणे ही त्याची खासियत होती. त्याच्यातील धाडसीवृत्ती आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन वासुदेव बळवंत फडकेंनी त्याचे कर्तुत्व सन्मार्गी लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले. क्रांतिवीर उमाजी नाईकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे कि ती मोलाचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरी च्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला स्वातंत्र्य संग्रामासाठी कार्य करण्याची गळ घातली. काम दरोडा घालण्याचेच होते परंतु ते देश सेवेसाठी करावयाचे होते व त्याची झळ गोर गरीब जनतेला बसू द्यायची नाही हे उद्दिष्ट समोर ठेऊन फडकेंनी उभ्या केलेल्या बंडात तो सह्भागी झाला. बंडाचे पहिले निशाण उभे केले ते २३ फेब्रुवारी १८७९ शिरूर जवळील धामरी गावातील ब्रिटीश प्रशासनासाठी कामकरणा-या मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकून तेथील कर्ज वचनचिठ्ठी आणि खतावण्या जाळून टाकल्या आणि गोर गरीब जनतेला सावकारी जोखडातून मुक्त केले. त्यानंतर दावडी निमगाव, पानमळा असे करीत करीत जेजुरी जवळील वाल्हे गावामध्ये ५ मार्च १८७९ रोजी मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकला. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या इंग्रज सरकार कडून  हरीला पकडून देणा-यास अथवा त्याची माहितीकळविणा-यास एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा ठाणे अंमलदार अकबर अली यास हरी मकाजी आपल्या कुटुंबीयासोबत नजीकच्याच बावी गावात येणार असल्याची खबर मिळाली. त्याने त्वरेने हालचाली करून वरिष्ठांपर्यंत ही बातमी पोहोचवली आणि इंग्रजअधिका-याच्या नेतृत्वाखाली बावी कडे कूच केले. गावक-यांनी हरी आणि त्याच्या कुटुंबियांना संरक्षण दिले. परंतु गोळीबाराच्या चकमकीत हरीचा सासरा मारला गेला आणि हरी त्याच्या जोडीदारासह जखमी अवस्थेत पकडला गेला. तो दिवस होता १३ मार्च १८७९, हरी सोबत त्याच्या घरातील पाच महिला आणि काही गावक-यांनाही अटक करण्यात आली. ब्रिटीश प्रशासनाने जाहीर केलेले एक हजार रुपयाचे इनाम अकबर अली याला देण्यात आले.हरीला पुण्याला आणून त्याच्यावर खटला चालविण्यात आला व फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हरीला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी अत्यंत क्रूरपणे व त्वरित करण्यात आली. इंग्रजांविरुद्ध बंड करण्याचे धाडस परत कोणत्याही रामोशी समजातील लोकांनी करू नये म्हणून जाहीर फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवती अमावस्येला रामोशी समाजातील प्रत्येक घरातील एकाने तरी सोमवती यात्रेसाठी जेजुरीला हजेरी लावण्याची पूर्व परंपरा असल्याने या यात्रेला रामोशांची गर्दी होणार हे ओळखून जेजुरीला पालखी मार्गालगत फाशी देण्याची जागा निवडण्यात आली. भर सोमवती दिवशी दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात हरीला फाशी देणार असल्याची दवंडी पिटण्यात आली. आणि सशस्त्रपोलीस गराड्यात अनेक रामोशांच्या डोळ्यादेखत ०४ एप्रिल १८७९ रोजी वडाच्या झाडाला लटकावून फाशी देण्यात आले. उमाजी प्रमाणेच हरी श्रीखंडेरायाचा जयजयकार करत फासावर चढला.
हरीनंतर त्याचा भाऊ तात्या मकाजी आणि रामाकृष्णा नाईक यांनी काही काळ उठाव केला, परंतु ते फार काळ हे कार्य करू शकले नाहीत. देशासाठी हरी फासावर चढला परंतु त्याच्या पश्चात त्याचा विसर सर्वांनाच पडला. आज ते वडाचे  झाडही अस्तित्वात नाही आणि हरीच्या हौतात्म्य स्मृती जपण्याची गरजही कुणाला उरली नाही. सरकार दरबारीही सारेच अलबेल आहे. महाराष्ट्र शासनाने हुतात्मा स्मारक उभे करून हरी मकाजीच्या स्मृती जगविण्याचा अल्पसा प्रयत्न केला पण त्याने काही साध्य झाले असे वाटत नाही. वाममार्गावर चालणा-या हरीने देशासाठी आपला मार्ग बदलला आणि हौतात्म्य स्वीकारले, आणि आम्हाला मात्र त्याच्या कार्याचा विसर पडावा यासारखे दुसरे कोणते दुर्दैव नाही

काव्यसुमनांजली

ऐक सांगतो इथेच गेला हरीमकाजी फाशी
रामोश्यांचे नगर जेजुरी हिच आयोध्याकाशी
सोमवतीची रामोश्यांची वारी पूर्वापार
म्हणुनी निवडला फाशीसाठी सोमवतीचा वार
जुनेपुराने झाड वडाचे डाक बंगल्यापाठी
तेच निवडले हरीमकाजी फाशी देण्यासाठी
दिली दवंडी यात्रे मध्ये फिरून चौफेर
आज नाईकहरीमकाजी फासावर जाणार
अथांग जनसमुदाय लोटला गर्दी अपरंपार    
आणि उडाला रामोशांच्या डोळ्यातून अंगार
सहस्त्रमुखांनी एकच केला प्रचंड जयजयकार
हरीमकाजी फाशी गेला गर्जत जयमल्हार
लटकत होता देह अचेतन हरीमकाजीचा
खडा पहारा आणि भोवती गो-यासोजिरांचा
कळंबीगावच्या रामोश्याचा वंश धान्य झाला
भारतमाते तुझ्याचसाठी हरी हुतात्मा झाला

                                                                  यशवंतराव सावंत. जेजुरी.

 

*बहिर्जी नाईक : शिवशाहीचा गुप्तहेर

बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव.छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधना पर्यंतचा साक्षीदार म्हणजेच नाईक होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहाकडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदादेखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.
महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळ जवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणु काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत.
असं म्हटलं जात कि,  महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते  माहिर होते. कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांचीदेखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याचीदेखील पुर्ण माहीती ते ठेवत. 

शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात

 लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.

अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका 

 1.महाराष्ट्र :  रामोशी हा शब्द "राम वंशी " या शब्दापासून तयार झालेला नाही. रामोशी हा शब्द १०० ते १५० वर्ष्यापासून वापरात आहे. त्याचा अगोदरच्या काळात रामोशी हे बेडर किंवा बेरड या नावाने ओळखले जायचे आणि तसा उल्लेख पेशवे काळामध्ये केलेला आहे. १८२८ मध्ये नरवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रामध्ये रोमोश्याचं उल्लेख "रानवाशी " असा केला आहे. त्या काळात रामोशी डोंगर दऱ्या मध्ये राहत असत . त्यांचे मुख्य काम म्हणजे १) गावाचे रक्षण करणे, २) पिकांची राखण करणे.

Ramoshis are Berads or Boyas. Ramoshi did notoriginate from 'Ram vamshi'. It is in use only for hundred to hundred and fiftyyears. Before that, they were called Berad or Bedar, as mentioned during rule ofPeshavas. Narveer Umaji Naik, in a letter of 1828, mentions as Ranvasi addressedto Ramoshis. Those days they were staying in hills and doing the job ofprotection of villages and crops in fields.
2. आंध्र प्रदेश : हा समाज इथे बोया , दोराबिद्डू , आणि वाल्मिकी या नावाने ओळखला जातो. दोराबिद्डू म्हणजे सरदार . बोया हे सरदाराचे मुले व वाल्मिकी चे वंशज आहेत असे म्हटले जाते.

Boya, Dorabiddu and Valmiki are thenames in vogue. Dorabiddu means sons of sardars. Boya consider themselves assons of sardars and descendents of Valmiki.
3. तामिळनाडू : इथे रामोशी वेदान या नावाने ओळखले जातात.

Name in vogue is 'Vedan'.
4. कर्नाटक : इथे रामोशी बेरड , बेडर या नावाने ओळखले जातात. बेडर म्हणजे निर्भीड ,"कोणालाही न भिणारा " असा शब्दप्रयोग मुसलमानांनी त्यांचा पुस्तकामध्ये   केलेला आढळतो. तसेच हा समाज इथे नायक, तलवार , नायवाडी,नायकर , वाल्मिकी , पाळेगार , इ. नावाने ओळखला जातो.
 नायक आणि नायकर : आंध्र प्रदेश्यातील काकतिया आणि विजयनगर साम्राज्या मध्ये "प्रदेशायाचा मुख्य हा नायक म्हणून ओळखला जायचा तर पारंपारिक "वतनदार " हे नायकर म्हणून ओळखले जात. पाळेगार आणि नायकर हे महाराष्ट्रातील देशमुख व देसाई यांच्या रक्त नात्यातील आहेत. खूप बेरड स्वपराक्रमाने पाळेगार झाले. तेलगु मध्ये नायक या शब्दाचा अर्थ "मालक किवा मुख्य ".
नायकवडी: हे किल्लेदाराचे  पद्नाव आहे. किल्लायचे तटभिंतीवरून रक्षण करणारे म्हणजे नायकवडी.
तलवार : हे गावातील रखवाली आणि महसूल विभागाची कामे करत.  गावाचे संरक्षण करण्यासाठी , महसूल कोशागारामध्ये नेताना ते तलवार वापरत असत. म्हणून त्यांचे नाव तलवार असे पडले.

Names Berad and Bedar are in vogue.Bedar was word used by Muslims either to show the dauntless quality or may beinability to pronounce properly. Muslim books use word Bedar. The names areBerad, Bedar, Nayak, Talwar, Nayavadi, Naykar, Valmiki, Palegar etc. each havingdistinctive meaning.

1. Nayak and Nayakar --During Kakatiya and Vijayanagar rulesin Andhra a head of a region was called Nayak, and traditional 'vatandars' werecalled Naykar. Akin to Deshmukh and Desais in Maharashtra, were Palegar andNaykars. Many Berads became Palegar on their own bravery. Nayak in Telgu meansOwnner or Head. May be this is origin of word.

2. Naykvadi was the title of Killedar.Those protecting outerwalls of fortes were called Nayakvadi. 3. Talwar was name one doing work ofvillage watchman or revenue work. For villege policing, carrying the landrevenue to treasury headquarters, the workers had to bear arms, so called Talwarmeaning sword.

 

 

 

 *Religious customs of Berad-Ramoshis*

1. देवता आणि कुलस्वामी : रोमोशी समाजाचा कुलस्वामी खंडोबा आहे. तसेच हे लोक मरी आई , काळूबाई , जानाई,  फीरंजाई , तुकाई , भैरोबा , आणि एल्लामा देवीची पूजा करतात.  कर्नाटक मधील बेरड लोक मल्लिकार्जुना , मौती , वेंकटेश व एल्लामा या देवांची पूजा करतात. बोया समाज तिरुपती चा वेंकट स्वामी , मरिअम्मा , कानाठ्राथान ची पूजा करतात. हे सर्व शिव भक्त आहेत. ते धार्मिक कार्य /विधी  जंगम किंवा लिंगायत स्वामी करतो. 

2. देवक( तोतेम): प्रत्येक कुळाचे वेगळे देवक असते. एका देवक मध्ये ( कुळामध्ये)  आडनाव वागले असले तरी  लग्न केले जात नाही. काही देवके : १) पान-कनिश २) वसन-वेल ३) सूर्य-फुल , ४) उंबर , ५) जांभूळ
3.जात पंचायत : महाराष्ट्रामध्ये जात पंचायतीचा मुख्य हा नायक असतो , आणि त्याला सर्वजण मानतात . नायक सर्व भांडण तंटे मिटवत असत. कर्नाटक मध्ये त्याला नायक किंवा काहीमानी तर आंध्र प्रदेश मध्ये त्याला नायडू , दोरा किंवा शिहासन बोया आहे म्हणत . जो कोणी जात पंचायतीचे नियम तोडील त्याला शिक्षा करण्याच अधिकार नायकाला असे. व त्यांचा न्याय हा अंतिम मानला जाई. शिक्षा ही गुन्ह्यावरून ठरवली जाई.

 4. Wedding / Barase / Marmik -- Lingayat or Jangam is required. Sometimes Brahmin does it. Remarriages and widow marriages are allowed. Groom pays to bride's father some teej/dej/tyaj. There WAS no dowry system.

5. Barase and pachavi -- Child is named on 13th day. 'ghugarya' are distributed. On 5th day 'pachava chi puja' is performed. This time 'satwai' is worshiped. Child is named on twelth or twentyfirst day.

6. Funeral rites -- Burial was in vogue. Somewhere they cremate. On 3rd or 7th or 12th day they do 'mati lotne'. 'uttar karya vidhi' is performed that time. At the burial place, the stones are aranged, gulal is sprinkled. On 3rd day flowers and 'naivadya' is offered.

*History of Berads*

There is no written history. Scanty writings are available by others. It has to be co-related with oral traditions. The original man was Guh. According to Rajguru of Shorapur princely state, Berads come from Tamilnadu migrating to Karnatake during Vijaynagar rule. Names of 14 ancestors are known to him but not whereabouts. The last was 'goshti pid nayaka', a contemporary of Shivaji Maharaj. This means the history dates back to 800 years from Shivaji's known date of 1630. Epigraphs of 8th to 11th century mention 'Bed-Beda', are they for the community? During Vijaynagar rule, these Nayak kings were assigned duty of protecting province of Tungabhadra. After of fall of Vijaynagar, the kings of Shorpur became independant. They only came under Bijapur court for name sake. But the Bijapur court was always afraid of Berad Nayak Kings. Later, during Maratha - Moghul conflict, Nayak kings played important role. After fall of Sambhaji and migration of Rajaram to Jinji, Moghu-Maratha conflict spread from Narmada to Tamilnadu and from east to west coast. Moghul Emperors realized they were fighting with a hurt identity in 1695. But it was not possible to turn back. During this conflict, Berad Nayaks played a delicate and important role. The families of all important Maratha sardars and their treasury was in Vagana-gera (or Wakin-kheda), the capital of these Nayak kings. Therefore, Aurangjeb had to fight his last battle of his life against Berad Nayaks of Vagana-gera during 1705 - 06.

*Struggle against the British*

Inumerable Berads sacrificed their lives in uprisings against the British. History knows very few names. The important are:

1. 1820 -1831 -- Umaji Naik, Bhulaji, Pandu Naik -- they rovolted in Pune, Nagar, Nasik, Satara, Solapur, Kokan. Most of participants in these rebelions were Ramoshis.

2. 1817 -- Gokak, Pachapur regions in Karnataka, Nayaks organized and rebelled. They were mostly Berads.

3. Revolt of Kittur Channamma and Sangoli Rayanna in Karnataka had mostly Berads,

4. 1817 -- Trimbak Dengale's revolt in Pune by sardars in Peshaai - mostly had Ramoshi, Bhil, Koli etc.

5. 1845 -1850 : Umaji's Sons Tukaram and Mankala revolted against British

6. 1857 - Uprising of Rango Bapuji in Satara, rebelled in name of Chatrapati of Satara. Centres established for recruitment where Ramoshi Koli and Mangs were in majority. Two Madane Brothers of Ramoshi wadi (Koregaon Satara) and Nana Ramoshi of Kundal were blown by cannon. Many Ramoshis from Tasgaon in Bijapur Taluka participated.

7. 1844-50 -- Tukaram and Mahankal, two sons of Umaji Naik revolted.

8. 1857 - Berads of Village Halgali Dist. Bijapur Karnataka revolted against disarming act. 19 Berads were hanged at Mudhol.

9. 1857 -- Raja Venkappa Nayak of Shurpur Dist Gulbarga rebelled. He died in struggle,

10. 1870 -- 1880 Rebellion of Vasudev Balwant Phadake was participated by most of Ramoshis. Head was Daulati Naik, who died in fight against Capt. Daniel in Tisubai Hills. Hari Ramoshi was hanged at Jejuri and Berads at Mudhol.

11. 1879: Hari Makaji & Tatya Makaji : they united Ramoshi's of Satara and revolted  against British

1910 -- Veer Sindhur Laxman rebelled against Sansthanik at Jat ant British, was killed by treachery.

12. Vajya - Baijya - fought against Saranjamdar at Kukudwad Dist Satara.

13. 1942 - 'Quit India' movement and formed 'prati sarkar' - parellel Government. Most Ramoshis of Satara Sangali Pune Districts participated

** Referance : www.jejuri.in  http://maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Poona-II/history_british.html#.